E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिक्रापूर-तळेगाव मार्गावरील अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू
Wrutuja pandharpure
11 May 2025
रांजणगाव गणपती
, (प्रतिनिधी) : शिक्रापूर-तळेगाव मार्गावरील शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीत पीएमपीएल बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी, रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश नंदकुमार शेलार (वय २०, रा.कुंभारआऴी तऴेगाव ढमढेरे, हर्षल दिगंबर घुमे (वय २०, रा.भोईआऴी तळेगाव ढमढेरे) व आयुष अतुल जाधव (वय १६, रा.नवयुग चौक सरकारी दवाखान्याजवऴ कामशेत-खडकाऴ ता. वडगाव मावऴ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तीन मित्रांची नावे आहेत. पीएमपीएल बसने त्यांना जोरदार धडक दिली की दुचाकी काही मीटर अंतरावर फरफटत गेली. या अपघातात तिघे तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
ऋषीकेश रमेश मुटके (रा. थिटेवस्ती, माधुरी निवास रायगड काँलनी, खराडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पीएमपीएल बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विजय सुरेश शेलार (रा. कुंभारआऴी तऴेगाव ढमढेरे ता.शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश व हर्षल घुमे हे एकमेकांचे मित्र होते. दुचाकीवर तिघेजण शिक्रापुरकडून तळेगाव ढमढेरेकडे निघाले होते. शाऴेच्या सुट्टीसाठी त्याचा मावस भाऊ आयुष जाधव हा नवयुग चौक सरकारी दवाखान्याजवऴ कामशेत-खडकाऴ (ता. वडगाव मावऴ) हा आलेला होता. शुक्रवारी तिघेजण हे दुचाकी घेऊन बाहेर गेले होते. संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विजय शेलार यांना फोनवरून माहिती मिळाली की, तऴेगाव ढमढेरे ते शिक्रापुर रोडवर त्रिमुर्ती मंगल कार्यालयासमोर मोटारसायकल व पीएमटी बसचा अपघात झाला आहे. तिघे मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना शिक्रापुर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघातात तिघांचेही डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. तसेच तिघांनाही गंभीर मार लागला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना शिक्रापुर येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. पुढील तपास पोसई मस्कर हे करीत आहे.
Related
Articles
पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करा : द्विवेदी
27 May 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
सावरकरांच्या देशभक्तीवरील गाण्याचा गौरव
28 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
4
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट